थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांनी परिसीमाच ओलांडल्याचे दिसून येत असून यामागे नेमक्या कोणत्या सुप्त शक्ती कार्यरत आहेत याची पोलीस आयुक्त दखल घेऊन चौकशी करणार आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे कारण या लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अशा आशयाचे पत्रच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले असून याची माहिती देण्याचे सांगितले आहे.

लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी-काळभोर गावात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून लोकांना खुप त्रास होत आहे. लोणी काळभोर गाव जिल्हा परिषद शाळा पाण्याची टाकी या ठिकाणी गावठी दारूची विक्री जोरात चालू असून गावातील लोकवस्तीत शाळेच्या एकदम जवळ बियर बार चालू आहे. त्याच बरोबर या परिसरात अवैध मटका क्लब, बेकायदा हुक्का पार्लर सह सर्व अवैध धंदे चालू आहेत. पान विक्रेत्यांच्या टपऱ्यांवर तंबाखू, जर्दा, मावा, गुटखा व नशेचे पदार्थ टाकलेल्या पानांची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे, यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात नशा, गुन्हेगारीकडे वळत आहेत.ही बाब अत्यंत संवेदनशील असून पोलीस यंत्रणा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याची तक्रार लोकांनी केली आहे. असल्याचे अमोल कोल्हे यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे.

मुळात या अवैध धंद्यांचा आश्रयदाता कोण आहे याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे.कसलीही कारवाई करायची म्हटल तर लगेच अज्ञात शक्ती हस्तक्षेप करत असल्याची सत्राची माहिती आहे यासाठी आयुक्तांनी याची सुक्ष्म माहिती घेऊन गांभीर्यपूर्वक कारवाई होणे अपेक्षित आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *