पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन भारती विद्यापीठ हद्दीतील मांगडेवाडी, कात्रज येथील एका इसमाकडून तब्बल ४३,८७,०००/- रु किं. चा चरस व गांजा जप्त केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व कर्मचारी भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीत गस्तीवर असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळालेल्या माहितीनुसार, अरुण अशोक अरोरा वय-५० वर्षे, रा-प्रितम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज पुणे याच्या ताब्यात घेऊन त्याच्याकडून

एकुण ४३,८७,०००/- रू.किमतीचा २ किलो १४० ग्रॅम चरस व १ किलो ७९० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द भारती विदयापिठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिकेत पोटे हे करीत आहेत.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, संदिप जाधव, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *