पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) कृषी आयुक्तालय, पुणे येथील फलोत्पादन ४ चे उपसंचालक, याना लाच मागणी व लाच स्विकारले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी दोन लाख पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्या विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे सन २०१९-२०२० मध्ये तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या कार्यालयात कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत असताना त्यांनी सुक्ष्म सिंचन (ठिबक सिंचन) च्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये केलेल्या कसुरीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीअंती कृषी सहसंचालक, अमरावती विभाग, अमरावती यांनी त्यांना दि. १७/१२/२०२४ रोजी सेवेतून निलंबित केलेले आहे.

लोकसेवक संजय गुंजाळ हे कृषी आयुक्तालय, पुणे या ठिकाणी उपसंचालक, फलोत्पादन ४ म्हणून नेमणुकीस आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे त्यांच्यावर आलेल्या निलंबनाच्या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी तसेच तक्रारदाराविरुद्ध ठेवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने चौकशी करुन एफ. आय. आर. दाखल न करण्यासाठी ३,००,०००/- (तीन लाख) रुपये लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत.प्रतिबंधक.विभाग. पुणे येथे केली होती.

या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक संजय गुंजाळ यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या निलंबनानंतरच्या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी आणि त्याच्याविरुद्ध एफ. आय. आर. दाखल न करण्यासाठी सुरुवातीस ३,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती २,५०,०००/- रुपयाच्या लाचेची मागणी करुन, तक्रारदार यांचेकडून रुपये २,५०,०००/- (दोन लाख पन्नास हजार) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्याना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकसेवक संजय गुंजाळ यांच्या FORD ECO SPORT कार क्रमांक MH 15/GF/3852 ची तपासणी केली असता, कारमध्ये लाच रक्कम सोडून २,१५,०००/- रुपये रोख मिळून आली.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *