पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) मकरसंक्रांतीच्या सणाची चाहूल लागताच पतंग उत्साहीची लगबग चालू होते ती मांजा आणि पतंग आणण्याची.परंतू यात वापरण्यात येणारी मांजा हा माणसांसाठी तसेच पशुपक्षांसाठी जीवघेणा ठरत असल्याने यावर शासनाने बंदी घातलेली आहे तरीही सर्वच शासकीय नियमानुसार याकडेही दूर्लक्ष केले जात असून सर्रासपणे हा नायलॉन मांजा बाजारपेठेत विकला जातोय. शासकीय यंत्रणांनी जर इमानदारीने यावर कारवाई केली तर अशी बेकायदेशीर विक्री होणार नाही परंतू तसे होताना दिसत नाही.

पुणे पोलिसांच्या युनिट 4 कडून अशाच नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे, गुन्हे शाखा युनिट-4 चे पथक हद्दीत गस्तीवर असताना पोलीस हवालदार विनोद महाजन व पोलीस हवालदार नागेश सिंग कुवर यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुंजाबा वस्ती मैत्री पार्क धानोरी या ठिकाणी एक महिला नायलॉन मांजाची विक्री करत आहे, तेथे जाऊन, त्या महिलेकडे विक्री करण्यासाठी आणलेला 1600/- रुपये किमतीचा नायलॉन मांजा मिळाला आहे. यावर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तिची वैद्यकीय तपासणी करून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 4 चे अजय वाघमारे व पोलिस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *