पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वेळेवर दामिनी मार्शल पथकाकडून शोध घेऊन आत्महत्येपासून परावृत्त केले त्यामुळे तिचा जीव वाचला.भरोसा पथकाच्या या कामाचे कौतुक होत आहे.

शिवाजीनगर दामिनी मार्शलकडून माहिती दिली की, एक महिला या मार्केटयार्ड येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे व तिचे लोकेशन मार्केटयार्ड हद्दीतील दिसत आहे. तेव्हा दामिनी मार्शल ने दिलेल्या माहिती वरून भरोसा सेेल पुणे शहर च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव व पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल तात्काळ मार्केटयार्ड दामिनी मार्शल यांच्याशी संपर्क करून त्यांना त्या ठिकाणी जाण्यास सांगितले, तिथे गेल्यावर या महिलेचा शोध घेतला असता, तिचे लोकेशन पर्वतीपोोली स्टेशन हद्दीत असल्याने पर्वती पोलीस दामिनी मार्शल यांनी तिचा शोध घेतला असता ती पर्वती पायथा येथे सापडली, तिला पर्वती दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार सपकाळ व पर्वती दर्शन मार्शल पोलीस अंमलदार भरगुडे व ठाकरे आणि जनता मार्शल पोलीस अंमलदार चव्हाण व मंडलिक यांच्यासह व दामिनी स्वारगेट मार्शल वरील महिला पोलीस अंमलदार धायतडक, मार्केट यार्ड दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार घाडगे यांच्यासह शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. तिथे त्यांची विचारपूस करून आत्महत्येचे कारण विचारले असता, तिने सांगितले की, नवऱ्यासोबत रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला होता. महिलेचे व तिच्या नवऱ्याचे समुपदेशन केले. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे त्यांना वरिष्ठांच्या समक्ष तिच्या मामा-मामी,पती आणि इतर नातेवाईक यांच्या ताब्यात सुखरूप दिले.

ही कारवाई शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सावंत व भरोसा सेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव , पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल भरोसा सेल गुन्हे शाखा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील दामिनी मार्शल वरील स्टाफ व पोलीस स्टेशन मार्शल वरील स्टाफ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *