पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) शिरूर हवेली विधानसभेचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यावर उपाययोजनांबाबत कामास जोमाने सुरुवात केली आहे.
नुकतेच कुकडी व घोड कालवा सल्लागार समिती बैठकीमध्ये स्वतः अहिल्यानगर येथे उपस्थित राहून शिरूर तालुक्याचे प्रश्न मांडले प्रामुख्याने प्रशासनाला कालव्यातील गाळ काढणे, कालव्याचे गंजलेले दरवाजे बदलून नवीन दरवाजे टाकावेत व दरवाजे टाकताना पाच फूट उंचीची भिंत बांधून बसविणे व कालव्याच्या पाण्याला अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फ़ांद्या हटवण्याच्या सूचना केल्या शिरूरच्या पिकपाण्याची स्थिती मांडली.
त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील तसेच तालुक्यातुन प्रतिनिधी म्हणून दादापाटील फराटे, श्रीनिवास घाडगे, संतोष फराटे आदी उपस्थित होते.
