पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) चंदननगर पोलीसांनी दिवसा घरफोडी करून चोरी करणार्‍यांचा शोध लावला त्यातील दोन्ही बाल गुन्हेगार असल्याचे समोर आले त्यांच्याकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या दोन इसमासह सोनारावर कारवाई करत त्याच्या ताब्यातुन ०३,५०,०००/- रु.किं.ची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका ठिकाणी अज्ञात व्यक्तीने कोडीकोयंडा तोडुन घरामध्ये प्रवेश करुन ५,४७,०००/- रु. किं.चे सोने चोरी गेल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार कदम व लहाने, यांनी आरोपीचा शोध चालू केला ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन बातमीदारामार्फत माहिती घेऊन त्यास ताब्यात घेतले ते दोघेही बाल गुन्हेगार असल्याने त्यांच्या पालकांसमोर चौकशीत त्यांनी चोरलेला माल दर्शन दत्तात्रय कोळी, वय २२, रा. झुरुंगे वस्ती, लोणीकंद पुणे. मुळ पत्ता शिवगंगा नगर, मजरेवाडी सोलापुर,आणि अनिल करेप्पा कोळी, वय २२, रा. राहटणी फाटा, धनगरबाबा मंदीर, पिंपरी मुळ पत्ता स्वामी विवेकानंदनगर, मजरेवाडी, सोलापुर यांना विकल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून तो माल सत्यवानकाका यमगर वय-२३ वर्ष रा. बाळेवाडी ता-आटपाडी जिल्हा सांगली या सोनाराने विकत घेतल्याचे उघड झाले.सोनाराने ते वितळून सोन्याची लगड केल्याचे सांगितले. तो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, दत्तात्रय लिगाडे हे करीत आहे.

 

ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे श्रीमती प्रांजली सोनवणे, चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे पोलीस अंमलदार सचिन रणदिवे, विश्वनाथ गोणे, शिवाजी धांडे, विकास कदम, नामदेव गडदरे, ज्ञानेश्वर लहाने, शेखर शिंदे, अनुप सांगळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *