पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामधील ९ पोलीस ठाणे यांच्याकडे वेगवेगळ्या कलमांना अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील ९४ तक्रारदार यांचा रु. १,८०,५७,३२९/- (अक्षरी रुपये एक कोटी ऐंशी लाख सतावन्न हजार तिनशे एकोणतीस फक्त) इतक्या किंमतीच्या दुचाकी, तिनचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम जमा असलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सन २०२३ चे कलम १०६ मधील तरतुदीनुसार हा किंमती मुद्देमाल संबंधित व्यक्तींच्या ताब्यात देण्यात आला.

वानवडी,पुणे शिवरकर रोड येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
