थेऊर   (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठडे अपघातास कारणीभूत ठरत असून अनेक निष्पाप वाहन चालक आपला जीव गमावत आहेत यावर साप्ताहिक हवेलीनामातून या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा झाला आज सोमवारी अधिकाऱ्यांकडून या ठिकाणाची पाहणी करण्यात आली.

तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या कार्यकालात बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले होते.यामुळे रेल्वे फाटकावर अडकून पडणार्‍या वाहन चालकांची चांगली सोय झाली.गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहतूक प्रचंड वाढली त्यात अष्टविनायक सुविधा प्रकल्पांतर्गत या रस्त्याचे काम झाल्यानंतर अलिकडे यात आणखी वाढ झाली.या उड्डाणपुलावर मध्यभागी पदचारी रस्त्याची सोय केली आहे.त्या काळच्या कुठल्या डिझाईनरकडून याची रेखांकन केले त्याच्या हे लक्षात आले नाही की या कठड्यावर वाहनांचा अपघात होऊ शकतो.सध्या हाच कठडा अनेकांचा जीव घेतो आहे.

या ठिकाणच्या दोन्ही बाजू धोकादायक आहेत यावर त्वरित निर्णय होऊन उपाययोजना झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अधिकारी या रस्त्यावर पाहणी करण्यास आलेलेच नाहीत. कार्यालयात बसून रस्त्यावरील निर्णय होतात असेच चित्र दिसून येत आहे.आज या विभागाचे अभियंता आर वाय पाटील या पाहणीसाठी आले तेंव्हा लोणीकंद थेऊरफाटा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यासंदर्भात देखील माहिती नव्हती.रस्त्याच्या बाजुच्या पट्ट्याचे मुरुमीकरण आहे की नाही हे देखील त्यांना अवगत नव्हते.

हवेलीनामाची टीम घटनास्थळावर जाऊन याबद्दल विचारल्यावर अधिकाऱ्यांकडे काहीच उत्तर नाही.त्यानंतर हे पथक थेऊर मुळा मुठा नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्याची पाहणीसाठी दाखल झाले.

ठेकेदाराकडून या रस्त्याची दहा वर्ष देखभाल दुरुस्ती करणे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठेकेदारांवर मेहेरबानी होत असल्याचे दिसून येत आहे.दुरुस्तीचे काम त्वरित अपेक्षित आहे अन्यथा या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *