शिवसेना मेळावा

         पुणे (हवेलीनामा ऑनलाईन)  पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत आजपर्यंत शिवसेनेचा  महापौर झाला नाही याची खंत असून येत्या निवडणुकीत हे चित्र बदलले पाहिजे भोसरीतून  शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे आपण सत्तेत आलो नाही तसेच पुढील वर्षी होणार्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढण्यास तयार आहे परंतु जागा वाटपात बिघाडी झाली तर शिवसेना स्वतंत्र  निवडणूक लढवणार असा सूचक इशारा देत सोबत आलात तर सोबत नाही तर तुमच्या शिवाय असे शिवसेना नेते संजय राऊत  यांनी स्पष्ट केले.ते भोसरी येथे शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात बोलत होते

पुढील महिन्यात होत असलेल्या महानगर पालिका जिल्हा परिषद पंचायत समिती  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कामाला लागले आहेत शिवसेनेच्या वतीने पुण्याच्या ग्रामीण भागातील मेळाव्य नंतर आज भोसरी येथे पदाधिकार्याचा मेळावा घेण्यात आला यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्क प्रमुख सचिन आहेर सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राऊत यांनी अनेक मुद्याना हात घातला महाआघाडीत काम करत असताना आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजेत परंतु पालकमंत्री शिवसेनेच्या कार्यकर्त्याची कामे करत नाहीत अशी महिती मिळते आहे त्यावर दादा आमची कामे करा नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत असा मिश्कील पण सूचक इशारा दिला

शिवसेना प्रत्येक प्रभागात निवडणूक लढण्यास समर्थ आहे परंतु सोबत आलात तर ठीक नाहीतर तुमच्या शिवाय असा सूचक इशारा कौग्रेस व राष्ट्रवादी कौग्रेस  यांना दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *