थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर जय मल्हार हॉटेल जवळ पुणे ६-७ इसमांनी लघुशंका का केली असे विचारल्याने रागावून
सुरक्षारक्षक व त्यांच्या पत्नीस हाताने व दगडाने मारहाण करून जखमी केलेने तसेच त्यापैकी एकाने गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.उपचारादरम्यान शितल चव्हाण हिचा मृत्यु झाला यातील तीन गुन्हेगार अटकेत असून अन्य गुन्हेगारांचा पोलीस तपासात होते फरारी गुन्हेगारांपैकी दोघांना खेड शिवापूर येथून ताब्यात घेण्यात आले.
थेऊर येथील घटना घडल्यानंतर गुन्हेगार पळून जात असताना युनिट ६ च्या पथकाने ०३ गुन्हेगारांना लोणीकंद येथील थेऊरफाट्यावर ताब्यात घेतले होते. परंतू इतर गुन्हेगारांचा शोध गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता.या गुन्ह्यातील जखमी महिला ही दि. ०१/१२/२४ रोजी मृत झाल्यानंतर मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेऊन वरीष्ठांच्या आदेशानुसार दरोडा व वाहन चोरी पथक १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बिडवई, युनिट ६ गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, दरोडा व वाहन चोरी पथक २ असे गेल्या ३ दिवसापासून त्यांचा शोध घेत असताना गोपनीय बातमीवरून मिळालेल्या माहितीनुसार खेड शिवापूर येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
१) मयूर शंकर जाधव, वय ३२ वर्षे रा. मु.पो. कुरुळी, बांदल वस्ती, दत्त मंदिराच्या बाजूला ता. खेड जिल्हा पुणे २) प्रथमेश उर्फ सोन्या आनंदा वाहिले, वय २३ वर्षे, रा. केळगाव, चिंबळी, आळंदी रोड, राधाकृष्ण मंदिराजवळ ता. खेड, जि. पुणे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येत आहे.
ही कामगीरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, सहाय्यक. पोलीस आयुक्त, पुणे रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक बिडवई, गुन्हे शाखा युनिट ६चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ व २ कडील सहा. पोलीस फौजदार दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार, गणेश ढगे, प्रदीप राठोड, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, महेश पाटील, संदीप येळे, विनायक येवले, समिर पिलाणे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे यांनी आहे.
