थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुलावर अपघाताची मालिका चालूच असून निरापराध वाहनचालक आपला जीव गमावत आहेत.आज गुरुवार रोजी एक दुचाकीस्वार या पदचारी कठड्यास धडकून दुचाकीवरील दोघांचा मृत्यु झाला,शासन यावर कसलाच उपाय शोधत नाही केवळ चालढकलपणा चालू असल्याने नागरिकांकडून तिवृ संताप व्यक्त करण्यात येत आहे.नेमका निर्णय किती बळी घेतल्यानंतर होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेली दोन्ही युवक केटरिंग व्यवसायातील आहेत कात्रज येथील टिळकनगर परिसरात वास्तव्यास असणारे हे दोन तरुण आहेत त्यात रामेश्वर किशोर राठोड आणि शाम गजमल जाधव अशी नावे असल्याचे समजते.दोघेही संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जामठी येथील मूळ राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.या दोनही मृत देहाच्या शवविच्छेदनासाठी पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी पोलीस हवालदार विजय जाधव आणि पोलीस शिपाई प्रशांत सुतार यांनी ससून रुग्णालयात घेऊन गेले.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवकांत खोसे करीत आहेत.

रेल्वे उड्डाणपुलावर पदचारी मार्ग म्हणून मध्यभागी दोन्ही बाजूस काँक्रीटचे कठडे तयार करण्यात आलेले आहेत रात्रीच्या वेळी याचा दुचाकीस्वार वाहनचालकास अंदाज येत नाही लांबून दिसून येत नाहीत जेंव्हा ते दिसतात तोपर्यंत ते त्याला धडकून रस्त्यावर पडतात रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते पाठीमागून येणाऱ्या वाहनाखाली सापडून वाहनचालक मृत्युमुखी पडतात. अशा अनेक घटना घडल्यानंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रशासन यांना याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही लोक प्रतिनिधी तरी लक्ष घालतील का?

प्रत्येक अपघातानंतर पत्रकारांकडून या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केला जातो परंतू काहीही बदल होत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *