थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी-काळभोर येथील ऐ.बी. के. अंबिका ज्वेलर्स, लोणीस्टेशन दुकानामधुन दुकानातील कामगाराने दुकानामधील काऊंटरचे खाली ठेवलेल्या बॉक्समधील एकुण रु. ४,३६,३९२/- किंमतीच्या सहा सोन्याचे चैन चोरुन पोबारा करणार्या गुन्हेगारास लोणीकाळभोर पोलीसांकडून जेरबंद करण्यात आले.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणीस्टेशन येथील ज्वेलर्स दुकानामधुन सहा सोन्याच्या चैन चोरुन कामगार पळाल्याची गुन्हा नोंद झाल्यानंतर याची दखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे करीत असताना, गुन्हयाचे घटनास्थळ असलेल्या भागामधील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपास अधिकारी पुजा माळी, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी पाहिले. तसेच गुन्हेगार हा मुळचा महाराष्ट्र व तेलंगणा राज्य सिमेवरील देगलुर जि. नांदेड येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५. पुणे शहर यांचे परवानगीने पोलीस हवालदार योगेश कुंभार व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी देगलुर जि. नांदेड येथून गुन्हेगार अमोल विठ्ठल गवळी वय २३ वर्षे येथुन ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली,त्याच्याकडून गुन्हयात चोरी केलेल्या सहा सोन्याचे चैन असा किं.रु. ४.३६.३९२/- चा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी या करीत आहेत.
ही कामगीरी अश्विनी राख, सहाय्यक. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर, राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे लोणीस्टेशन पोलीस चौकी प्रभारी महिला पोलीस उपनिरीक्षक, पुजा माळी, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार योगेश कुंभार, पोलीस हवालदार तेजस जगदाळे, पोलीस हवालदार संभाजी देवीकर, पोलीस अंमलदार तुकाराम येडे व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे या पथकाने कामगिरी केली आहे.
