पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) सहकार नगर पोलीस स्टेशन कडून दोन सराईत वाहन चोरी करणाऱ्या जेरबंद केले त्यांच्याकडून आठ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.या प्रकरणी अन्वर सलीम शेख वय २१ वर्षे धंदा गॅरेज काम रा. नूर मंहम मस्जिद गल्ली दाते बसस्टॉप सहकारनगर पुणे २) फरीद लालापाशा सय्यद वय १९ वर्षे धंदा गॅरेज काम रा.नुर मंहमद मस्जिद गल्ली दाते बसस्टॉप सहकारनगर पुणे यांना ताब्यात घेतले आहे.
सहकार नगर पोलीस स्टेशन कडील पोलीस कर्मचारी आपल्या परिसरामध्ये चोरी वाहन इत्यादी संदर्भात गुन्हे उघड करणे यासाठी गस्तीवर असताना एका यामाहा दुचाकीवरून दोन इसम भरता वेगाने बिकानेर चौकाकडे जाताना दिसले संशय आल्याने पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील वाहनांची चौकशी केली असता हे वाहन त्यांनी दोन महिन्यापूर्वी दाते बसस्टॉपवर चोरल्याचे सांगितले त्यावर त्या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी सात वाहने चोरल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, विनायक एडके, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, अभिमान बागलाने, बबलु भिसे, सचिन येनपुरे, नामदेव केंद्रे यांनी केली आहे
