थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लघुशंका करताना हटकल्याने किरकोळ वादातून लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील थेऊरमध्ये हवेत गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार केल्यानंतर हे सर्व घटनास्थळावरून लोणीकंद बाजूकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीमध्ये फिर्यादी अक्षय साहेबराव चव्हाण यांची पत्नी शीतल अक्षय चव्हाण वय ३२ रा थेऊर जय मल्हार हाॅटेलजवळ या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटना घडल्यानंतर लोणीकाळभोर पोलीसांनी पुढे गुन्हे शाखा यूनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना संपर्क साधून एक काळे रंगाची फॉर्च्युनर गाडी थेऊर बाजूकडून केसनंद बाजूकडे वेगाने येत असलेबाबत कळविले असता त्यांनी तात्काळ आपल्याकडील कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक बनवून लोणीकंद बाजूकडे पाठवले. तसेच पुढे लोणीकंद तपास पथकाशी संपर्क साधुन लोणीकंद येथील थेऊरफाटा येथे ही फॉर्च्युनर गाडी युनिट ६ च्या पथकाने व लोणीकंद तपास पथकातील दोन कर्मचाऱ्याच्या मदतीने गाड्या आडव्या लावून अडथळा करून एकूण तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे. त्याची नावे सतीश बारीकराव लोखंडे वय ३१, अजय दशरथ मुंढे वय २६, भानुदास दत्तात्रय शेलार वय ३२ सर्व रा. चिंबळी फाटा, ता खेड, जि पुणे अशी आहेत. तर गाडीमधील तीन व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. ताब्यात असलेल्याकडून एक पिस्टल व काही काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

थेऊर मध्ये ही घटना घडल्यानंतर याची माहिती थेऊर चौकीस मिळाल्यानंतर येथील पोलीस हवालदार विजय जाधव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट,पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके आणि कर्मचारी तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी युनिट 6 चे अधिकारी यांना संपर्क केला तसेच गुन्हेगारांचा पाठलाग करत लोणी-काळभोर पोलीसांचे एक पथक लोणीकंदच्या मार्गाने निघाले.सर्व बाजूनी एकत्रित प्रयत्नानंतर ही गाडी पकडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *