पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) अनेक वर्षापासून थेऊरमध्ये वास्तव्यास असलेल्या संशयित बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध अवैधरित्या देशात घुसून वास्तव्य करणे तसेच भारतातील रहिवासी कागदपत्रे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड,पॅनकार्ड, पासपोर्ट असे विविध बनावट कागदपत्र तयार करून राहिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत सरकारकडून देशात अवैधरित्या वास्तव्य करून राहणार्‍या बांग्लादेशी नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येत असून काल मंगळवारी पुणे पोलीसांचे दहशतवाद विरोधी पथकाने हवेलीतील थेऊर येथून गेली कित्येक वर्ष वास्तव्यास असलेल्या संशयित बांग्लादेशी नागरीकास ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध देशात अवैधरित्या घुसखोरी करून वास्तव्य करणे तसेच भारत बांगलादेश सिमा मुलकी अधिकाऱ्यांच्या कोणत्याही परवाणगी शिवाय देशात राहिल्या बदल गुन्हा नोंदविण्यात आला आले.

गेली अनेक वर्षांपासून हा संशयीत थेऊर येथे वैद्यकीय व्यवसाय करतो आहे.पोलीस तपासात आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

लोणी-काळभोर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *