पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पी एम पी एम एल बस थांब्यावर बसमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणात होणार्‍या गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरटयाकडून मौल्यवान वस्तूंसह पैशाची चोरी करणार्‍या दोन महिलांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून ०४,८८,००० रु किमतीचे सहा तोळे सोने हस्तगत करण्यात आले.

गुन्हयाचे तपासात स्वारगेट पोलीस स्टेशनकडील दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार अनिता घायतडक यांना स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गस्तीवर असताना कात्रज पीएमपीएल बस स्टॉप येथे काळा व हिरव्या रंगांचा टॉप परिधान केलेल्या अशा वर्णनाच्या दोन महिला संशयितरित्या फिरत असल्याचे दिसले त्यांचेवर संशय निर्माण झाल्याने त्यांनी मदती कामी तपास पथकातील अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांना बोलावुन त्या महिलांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडील चौकशीत त्या दुर्गा अविनाश उपाध्याय वय ३० वर्षे रा. सध्या म्हाडा कॉम्पलेक्सजवळ, खडकी पुणे, मुळगाव सरकारी दवाखान्याजवळ, दर्याचे पाठीमागे, बापुनगर गुलबर्गा,( कर्नाटक), लक्ष्मी मिवा सकट वय २५ वर्षे रा. सध्या म्हाडा कॉम्पलेक्स जवळ, खडकी पुणे, मुळगाव होम मैदान सिद्धेश्वर मंदीराजवळ सोलापुर असे असल्याचे सांगितले

त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे कडे महिला पोलीस अंमलदार धायतडक यांचे समक्ष पोलीस अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांनी कौशल्य पुर्ण तपास केला असता त्यांनी सांगितले कि, गेले ७ ते ८ महिन्यांपुर्वी त्या दोघींनी स्वारगेट येथील आळंदी पी.एम.टी बस स्टॉप येथे एका महिलेच्या हातातील बांगडी चोरी केली होती असे सांगितले.

पोलीस कोठडी मधील तपासा दरम्यान त्यांचे कडुन ०४,८८,०००/- रु. किं. चे ६० ग्रॅम वजनाचे (६ तोळे) सोन्याचे दागीने जप्त करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परि.२ श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंगलदार गोराळे, तनपुरे, घुले, पवार, शिंदे, टोणपे, खेदाड, शेख, चव्हाण, दुधे, महिला पोलीस अंगलदार सिताप, शिंदे, अनिता धायतडक, सांगोलकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *