वाघोली – (हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे नगर महामार्गावर वाघोली (ता.हवेली) येथील केसनंद फाटा येथे डंपरच्या भीषण अपघातात अमरावतीहून पुण्याला मंजूरीसाठी आलेल्या वाघोलीतील फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये दोन लहान बालकांच्या समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत केसनंद फाटा येथे रात्री एक ते दोनच्या सुमारास भरधाव वेगानेश आलेल्या डंपरने फुटपाथवर झोपलेल्या मजूरांना चिरडले या भीषण अपघातात अमरावती येथील तीन जण मृत्युमुखी पडले तर सहा जण जखमी झाले.या अपघाताची फिर्याद
वीरेंद्र परमदासजी भोसले (वय 45 वर्ष धंदा मजुरी सध्या केसनंद फाटा फिरस्ता मूळ राहणार सारवाडी देववाडी तालुका कारंजा घाडगे जिल्हा वर्धा) यांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी डंपर चालक गजानन शंकर तोटरे, (वय 26 वर्ष सध्या राहणार केसनंद ता.हवेली
मूळ राहणार पाळा तालुका मुखेड जिल्हा नांदेड ) याला ताब्यात घेतले आहे.
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्षे
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्षे
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्षे
       (सर्व रा.अमरावती) हे मयत झाले असून या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार, 18 वर्षे
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18 वर्षे
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे  वाघोली पोलीस स्टेशनचे समोरील मोकळ्या गायरान जागेमध्ये फुटपातलगत केसनंद फाटा वाघोली येथे झोपेत असताना पुण्याकडून केसनंद कडे जाणारा हायवा डंपर MH 12/VF/0437 चालकाने  दारूच्या नशेत डंपर भरधाव वेगाने चालवून डिव्हायडर वर चढवून अपघात केला यात 3 मयत व 6 जखमी झाले जखमींवर ससून हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.
पुढील तपास पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
वाघोली पोलीस स्टेशन पंडीत रेजितवाड, निलेश घोरपडे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *