पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) अवैधरित्या गुटखा वाहतुक करणा-या दोन जण पोलिसांच्या ताब्यात तब्बल  ८,५८,०००/- (आठ लाख अठावन्न हजार रुपये) किंमतीचा गुटखा व १० लाख रुपये किंमतीचे दोन टेंम्पो असा एकुण १८,५८,०००/- (अठरा लाख अठावन्न हजार) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये सौरभ निंबाळकर व संग्राम निंबाळकर यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
 स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संजय भापकर यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फालेनगर मध्ये अवैध गुटख्याची टेंम्पोमधुन वाहतुक होत असल्याची महिती मिळाली असता पोलीस उप आयुक्त परीमंडळ ०२ मधील सहाय्यक पोलीस संतोष कोळी, पोलीस अंमलदार पंकज माने, स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राहुल तांबे, कुंदन शिंदे, सागर केकाण तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी, तपास पथकाचे अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमोले यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील फालेनगर, लेन नंबर ५, येथील एका दुकानासमोर  रोडच्या बाजूला आरोपी सौरभ ऊर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (वय २४ वर्षे, रा.श्रीराम सोसायटी, आय विंग फ्लॅट नंबर ५, थोरवे शाळेसमोर)२ संग्राम रामकृष्ण निंबाळकर, वय २६ वर्षे, (रा. श्रीराम सोसायटी, आय विंग फ्लॅट नंबर ५, थोरवे शाळेसमोर) दोघेजण त्यांचे ताब्यातील टेंम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला गुटख्याचा ८,५८,०००/- (आठ लाख अठावन्न हजार रुपये) माल विक्री करता बाळगताना मिळुन आला आहे  १० लाख रुपये किंमतीचे दोन टेंम्पो असा एकुण १८,५८,०००/- अठरा लाख अठावन्न हजार रुपयेचा माल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा,  अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील,  पोलीस उपआयुक्त  स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी, स्वारगेट पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *