थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) यावर्षीच्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत लोणीकंद येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत ५० मीटर धावणे लहान गट मुली या गटात थेऊर (ता.हवेली) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा या शाळेची विद्यार्थिनी संयुक्ता विजय कोळेकर हिने प्रथम क्रमांक मिळवून ती जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
संयुक्ता व शाळेचे शिक्षक यांचे थेऊर ग्रामपंचायतचे पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती तारमळा यांनी कौतूक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून पंचक्रोशीत नावाजलेल्या तारमळा शाळेची विद्यार्थिनी जिल्हा स्तरावर हवेली तालुक्याचे नेतृत्व करणार आहे यामुळे पालकवर्ग व शिक्षक यांच्या आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *