पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) १४जुलैला सहकारनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चव्हाणनगर कमानी शेजारी असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानाचे शटर उचकटुन आतमध्ये प्रवेश करुन सतरा लाख ब्यायऐंशी हजार चारशे (१७,८२,४७९) रुपये किंमतीचे मोबाईल फोन चोरुन नेले होते याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरीतील तीन तीन आरोपींना मुद्देमालसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहकारनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चव्हाण नगर येथील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून ६५मोबाईल चोरून नेले होते.
यात आंतरराज्य घरफोडी करणारे आरोपी १) मोबीन मुन्ना देवान (वय ३६ वर्षे रा. बिरता चौक बसननगर, ठाणा घोडासन राज्य बिहार) २) अरुण किशोरी सहा (वय ५२ वर्षे रा. वार्ड नं १७ मोतीहारी मठिया डीह ठाणा छतावणी राज्य बिहार) ३) शमसाद आलम सरजउल अन्सारी (वय ३६ वर्षे रा. अठमुहाण जिल्हा मोताहारी ठाणा झादौखद राज्य बिहार) यांना ताब्यात घेवुन आरोपीकडुन एकुण १७,८२,४७९ रुपये किमताचे विविध कंपनीचे ६५ मोबाईल फोन जप्त केले आहेत.
सदरचे मोबाईल शॉपी चालकास पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते परत केले आहेत.
