वाघोली – (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आज विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मतदारसंघातील वाहतूक कोंडी तसेच बिबट्याचा नागरिकांवर होणारे जीवघेणे हल्ले राखण्यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
पुणे सोलापूर रोड हडपसर ते उरुळी कांचन दररोज होत असलेली वाहतूक कोंडी तसेच नगर रोडला होणारी वाहतूक कोंडी याचा विषय विधानसभेमध्ये उपस्थित करून योग्य त्या वाहतुकी संदर्भातल्या उपाययोजना करण्याची मागणी केली कारण या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे अनेक अडचणीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत असून रुग्णवाहिका देखील या वाहतुक कोटींचा फटका बसत आहे त्यामुळे यावर वाहतुक विभाग तसेच प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करुन वाहतुकीचा दोन्ही महामार्गावरील प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली तसेच शिरूर हवेली मतदारसंघामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत तीन नागरिकांचा मृत्यू झालेला असून या बिबट्यांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे.बागायती व ऊस पट्ट्यातील शेतकरी दिवसरात्री शेतातील परीक्षांना पाणी देण्यासाठी शेतात असतात त्यामुळे बिबट्या पासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी विधानसभेमध्ये आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केली.
