पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) थेऊर येथील गणेशवाडी जवळ मयुरी मिसळ हाँटेल शेजारी एका दुचाकीस्वारास टेम्पोचा धक्का लागल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या इसमास टेम्पो चालकाने त्याच्या छातीत लाथा मारल्याने बेशुद्ध होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला टेमो चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,काल शनिवारीसायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुंदर शिवा पवार हे आपल्या दुचाकीवरून थेऊरकडे येत असताना गणेशवाडी जवळ असलेल्या मयुरी मिसळ शेजारी लाल रंगाचा टेम्पो क्र. (एम एच १२ एस के ८१२७) या वाहनाचा धक्का लागला त्यात पवार यांना किरकोळ दुखापत झाली याचा जाब विचारण्यासाठी गेले असता टेम्पो चालकाने डाव्या दरवाज्यात उभ्या असलेल्या पवार यांच्या छातीत ४ ते ५ लाथा मारल्या त्यामुळे ते बेशुद्ध पडले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी टेम्पो चालक आदित्य सुधीर धाराशिवकर रा.फ्लॅट १५ कामधेनू इस्टेट भाजी मंडई समोर हडपसर पुणे यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर,श्रीशैल्य चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक गोरे यांनी भेट दिली असून पुढील तपास थेऊर पोलीस चौकीचे अधिकारी श्रीशैल्य चिवडशेट्टी करीत आहेत
