पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) बनाना लीफ कल्याणी नगर येथे हाॅटेलमध्ये चोरी करणारा गुन्हे शाखेच्या युनिट-४ करुन जेरबंद करण्यात आला आहे.

युनिट-४ कडील पथक येरवडा पोलीस स्टेशन येथे गस्तीवर असताना, पोलीस.हवालदार. हरीश मोरे व विशाल गाडे यांना माहिती मिळाली की, कल्याणी नगर येथे हॉटेलमध्ये चोरी करणारा सौरभ शिवाजी साबळे वय २६ वर्ष रा. वैष्णवी सिटी देवाची उरुळी, आदर्श नगर हडपसर, पुणे. येथे दुचाकीवर बसून कोणाची तरी वाट पाहत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लगेच पथकासह पोहोचून त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे येरवडा पोलीस स्टेशन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, त्याने रोख रक्कम चोरली असल्याची माहिती दिली आहे.

वरील प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणून त्याच्याकडून २,६५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई करता येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा,युनिट 4, पुणे. अजय वाघमारे व युनिट 4 कडील पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *