लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसेवा ) लोणी स्टेशन येथील अल्पवयीन मुलगा रूसून निघून गेला घरातील सर्व नातेवाईकांकडून त्याचा शोध घेण्यासाठी सोशल मिडियाचा आधार घेऊन व्हाट्सअप गृपला मेसेज व फोटो टाकले होते या सोशल मिडिया गृपवर मिळालेली माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना सांगितली असता पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली, घोडके यांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पथकाला सोबत घेऊन लोणी स्टेशन परिसरात शोध सुरू केला असता एक तासाच्या शोध मोहिमेत मुलगा लोणी स्टेशन हद्दीतील घोरपडी वस्ती येथे सापडला त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवल्या मुळे हा मुलगा आईवडिलांना कडे सुखरुप पोहोचला.त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचे नागरिकांकडुन कौतूक होत आहे.

यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट,  पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके, विकास जगदाळे, उमाकांत काळभोर व गुन्हे शाखेतील पोलिस पथक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *