पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पूर्व हवेलीतील मांजरी खुर्द परिसरात मुळा मुठा नदीकडेला अवैध हातभट्टी गुन्हे शाखा युनिट 6 कडून उध्वस्त केली.घटनास्थळावरून सुमारे ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व ४००० लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण १,४८,५००/-रू किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक १६/१२/२०२४ रोजी युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करीत असताना माहिती मिळाली की, मांजरी खुर्द गाव येथील गोदरेज बांधकाम साईटच्या समोर ओढ्याच्या बाजूला नदी किनारी एक व्यक्ती भट्टी लावून दारू तयार करीत आहे. तेथे पथकाने अचानकपणे छापा घातला घटनास्थळी सुमारे ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व ४००० लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण १,४८,५००/-रू किं चा मुद्देमाल सापडला आहे. भट्टी चालकाबाबत माहिती घेतली असता बन्सीलाल शांतीलाल कर्मावत वय ५० रा. उंद्रे पेट्रोल पंपासमोर मांजरी ता. हवेली, जि. पुणे याची असल्याचे समजले. वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कामगीरी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) 02 राजेंद्र मुळीक, प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण युनिट -6 यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर ऋषीकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *