लोणी काळभोर – (हवेली नामा वृत्तसेवा) परभणी येथे संविधान शिल्प विटंबना झाल्यावर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलने करीत असताना आंदोलक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडी मध्ये संशयास्पद मृत्यू झालेला आहे .या घटनेचा निषेध करण्यासाठी पुर्व हवेली सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने लोणी स्टेशन चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यात ज्या नराधमाने संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना केली त्यांच्या कठोर कारवाई करण्यात यावी तसेच निषेध आंदोलन करताना भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मुत्यूची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत अशा मागण्याचे निवेदन लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांना उपस्थित भीमसैनिकांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी शेकडो भीमसैनिक व संविधान समर्थक नागरीक उपस्थित होते.या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे, बहुजन दलित महासंघ अध्यक्ष आनंद वैराट, लोणी काळभोर ग्रामपंचायत गणेश कांबळे, रिपब्लिकन युवा नेते दिपक आढाळे, मातंग एकता आंदोलन सरचिटणीस दिगंबर जोगदंड, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे राकेश लोंढे, वंचित बहूजन आघाडी संजय भालेराव, नितीन जगताप, केतन निकाळजे , बाळासाहेब दाभाडे, अमोल टेकाळे, विशाल शेलार,करण खंडागळे, अभिजीत पाचकुडवे व असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते .
