थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा) युवराज काकडे युवा मंच व बुधराणी हॉस्पिटल पुणे व सुपर आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र रोग शिबिर थेऊर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेत  आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये गावातील नागरिकांचे डोळे तपासणी शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याचा गावातील नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरात गावातील तब्बल ३०३ नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी २६ नागरिकांनी नावनोंदणी केली असून त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया  मोफत करण्यात येणार असल्याचे थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी सांगितले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे,रूपचंद बोडके,संतोष ओव्हळ, वैभव कुंजीर,माणिक चव्हाण,अमोल काकडे,किरण काकडे,रायचंद जाधव,सोनू गायकवाड, तसेच युवा मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नेत्र तपासणीसाठी जेष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग यांनी गर्दी केली होती.
“गेली अनेक दिवसांपासून गावांमध्ये मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर घेऊन त्यामध्ये गरीब कुटुंबातील जेष्ठ नागरिक यांना डोळ्या संबंधित आजाराचे निदान करुन अलीकडेच्या काळात युवकांसह जेष्ठ नागरिक यांच्यामध्ये मोतीबिंदूचे पेशंट वाढत आहे त्यामुळे गरीब कुटुंबातील नागरिकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले यात थेऊर मधील २६नागरिकांचे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या पुढील काळातही नागरिकांच्या आरोग्या विषयी विविध प्रकारची शिबिर घेण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहून रुग्ण सेवेचा घेतलेला वास अविरतपणे सुरु ठेवणार आहे”.
(युवराज काकडे ग्रामपंचायत सदस्य थेऊर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *