लोणी काळभोर – (हवेलीनामा वृत्तसेवा)
लोणी काळभोर ता.हवेली येथे होमगार्डचा ७८वा वर्धापन दिन लोणीकाळभोर पथकातील जवानांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी लोणी काळभोर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा याठिकाणी वृक्षारोपण करून साजरा केला यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पोलिस हवालदार विजय जाधव, विशाल बनकर, एन ए कोल्हे,वैजनाथ शेलार, हवेली तालुका होमगार्ड समादेशक खंडू कोळेकर तसेच सर्व होमगार्ड टीम उपस्थित होते.यावेळी
रामदारा शिवालय देवस्थान येथे वृक्षारोपण करून परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले उपस्थित होमगार्ड जवानांना लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी मार्गदर्शन करून वर्धापनदिना निमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी 1008 हेमंत पुरी महाराज, मनु पुरी महाराज उपस्थित होते.
