पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) दि.२८नोव्हेंबर रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव,धायरी भागातील सराफी दुकानामध्ये एका इसमाने सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बाहाण्याने गळ्यात घालून चोरीच्या उद्देशाने दुकानातून सोन्याची चैन घेऊन निघून गेला असता    सिंहगडरोड पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात कपिल जयराम चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याकडून चार गुन्ह्यातील पाच सोन्याची चैन आणि दुचाकी
असा३,६४,४८० रुपये किंमतीची मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव धायरी भागातील सराफी दुकानात सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या एक इसम गळ्यात चैन घालून चोरी करुन निघून गेला होता या गुन्हयाचा तपासासाठी दोन पथक तयार करण्यात आली होती यावेळी पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार तारु, क्षीरसागर, मोहीते यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सोनाराच्या दुकानात सोने खरेदी करण्याचे बहाण्याने दुकानात जावुन त्यांच्या दुकानातील चैन चोरी करणारा संशयीत इसम हा कोथरुड परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कपिल जयराम चव्हाण (वय ३९ वर्षे रा. घर नं ६ रामचंद्र स्मृती बिल्डींग, शास्त्रीनगर कोथरुड, पुणे) याला अटक करण्यात आली असून  चोरीस गेलेल्या चैन त्याच्याकडुन हस्तगत करण्यात आली.
वरिल गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने एकुण चार गुन्हयातील ५ सोन्याच्या चैनी व गुन्हा करताना वापरलेली एक दुचाकी असा एकुण ३,६४,४८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील,पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३ संभाजी कदम,सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग अजय परमार,सिंहगड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)उत्तम भजनावळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल यांचे पथकाने केली.
 पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *