पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) अंमली पदार्थ विरोधी पथक-१चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराची माहिती काढुन कारवाई करण्याकरीता अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे व पोलीस अंमलदार लोणीकाळभोर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलींग करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना मिळालेल्या माहितीनुसार कवडीपाट टोलनाका जवळ, रेड्डी हॉटेल शेजारी, सार्वजनिक रोडवर, पुणे सोलापुर महामार्गावर सापळा रचुन साहिल विनायक जगताप वय २८ वर्षे, रा. हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे याला ताब्यात घेतले त्याकडील सॅकबॅगचे झडतीमध्ये कि.रु.३,१३,८४०/- चा १४ किलो १८२ गांजा अंमली पदार्थ व इतर ऐवज बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे १, गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, तसेच पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बांगर, भगत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *