वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा ) कोलवडी साष्टे गावच्या हद्दीतील रिकामे वस्ती येथे मुळा मुठा नदीच्या काठावर अवैध दोन गावठी हातभट्टी वर युनिट सहाची कारवाई यात चार लाख बेचाळीस हजार (४,४२०००) रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ज्ञानेश्वर गब्बर रजपूत व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट ६मधील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी व स्टाप हद्दीत गुन्हे अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करत असताना माहिती मिळाली की, कोलवडी साष्टे येथील रिकामेवस्ती परिसरात नदीच्या शेजारी एक दारूची भट्टी लावुन दारू तयार करत असल्याची माहिती मिळली असता त्याठिकाणी जाऊन छापा टाकला असता ज्ञानेश्वर गब्बर रजपूत( वय २१, रा. वाडेगाव, ता. हवेली, जि. पुणे) हा साष्टे गावच्या हद्दीतील रिकामेवस्ती येथे भट्टी लावुन दारू काढत असताना मिळुन आला. या कारवाईत ७० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, ८००० लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा २,९२,०००/- किमतीचा माल मिळुन आला तसेच दुसऱ्या भट्टीवर हातभट्टीची दारू एक महिला देखील तयार करत असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी ५० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू, ४००० लीटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकुण १,५०,००० चा माल मिळुन आला दोन्ही कारवायांमध्ये एकुण ४,४२,००० माल मिळुन आला.
याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.११७१/२०२४, महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायदा कलम ६५ (फ) (ब) (क) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे,पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक युनिट-६ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे
