वाघोली (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरुर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन वाघोलीतील पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली.

वाघोलीगाव पुणे महानगरपालिकेत गेल्यापासून महानगरपालिकेवर प्रशासक असून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी विलंब होत आहे त्यामुळे वाघोलीतील नागरी समस्या रस्ते ,पाणी ,नाले ,वाहतूक तसेच इतर अनेक स्थानिक समस्या सोडविण्यासाठी आमदारांनी स्थानिक नेत्यांसमवेत महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन लवकरच महानगर पालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी तसेच पीएमआरडीए ,सार्वजनिक बांधकाम विभाग,विद्युत विभाग या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन कामे लवकर मार्गी लावण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले ,आयुक्तांनी यावर लवकरच सर्वांची एकत्रित बैठक घेऊन वाघोलीच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे संदीप सातव,अनिल सातव,माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *