पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) सिंहगड पोलिसांची मोठी कारवाई अवैध्यरित्या व्यावसायीक गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणा-यावर छापा टाकुन ७२ व्यावसायीक गॅस टाक्या व एक पिकअप टेम्पो असा एकूण दहा लाख अठ्ठावीस हजार चारशे(१०,२८,४००) रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सोमनाथ भोजने याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
 सिंहगड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार देवा चव्हाण तपास पथकातील स्टाप यांना बातमीदारामार्फत सिलेंडरच्या काळाबाजार सुरू असल्याचे समजले असता पथकाने वडगाव भाजी मंडई, गोयल गंगाकडे जाणा-या रोडच्या कडेला सिंहगड रोड पुणे येथे एक इसम हा अनाधिकृतपणे  सीलबंद व्यवसायीक गॅस सिलेडंरची अवैद्यरित्या विक्री करीत असल्याचे आढळून आले सार्वजनिक रस्त्यावर सिंहगड रोडवर  एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो उभा असलेला दिसला, सदर टेम्पो मधुन एक इसम निळ्या पिवळ्या रंगाच्या गॅसच्या टाक्यांचा अवैधरित्या साठा करुन विक्री करताना दिसुन आला सदर ठिकाणी छापा टाकला असता  सोमनाथ लहु भोजने (वय- ३१ वर्षे रा. रिध्दी-सिध्दी बिल्डींग पार्कीग रुममध्ये, सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे) हा भरलेल्या टाक्या ह्या त्याच्या मालकाने  विक्री करण्यासाठी दिल्या होत्या असे सांगितले मिळुन आलेल्या टाक्यांची पंचाची समक्ष पाहणी केली असता एच पी गॅस व भारत गॅस कंपनीच्या एकुण ७२ टाक्या व एक महिंद्र कंपनीचा पिकअप टेम्पो असा एकुण १०,२८,४००/-रु. किं.चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं ७३१/२०२४ बी.एन.एस. कलम भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २८७,२८८,३ (५) सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ अन्वये दाखल करण्यात आला
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परीमंडल ३संभाजी कदम, सहा पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दिलीप दाईगंडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे आण्णा केकाण, उत्तम तारू, पंकज देशमुख,अमोल पाटील, विकास पाडोळे, शिवाजी क्षीरसागर, राहूल आलेकर, स्वप्निल मगर, विनायक मोहिते,विकास बांदल यांच्या पथकाने केली
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *