पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अल्पवयीन मुलांची शोध मोहिम राबविण्याच्या वरिष्ठांनी सूचना मिळाल्यानंतर यूनिट ६ कडील अंमलदार महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, पोलीस अंमलदार सचिन पवार हे आपल्या हददीत गस्तीवर असताना वाघोली येथील बाईफरोडवरील निखार लेडीज शॉप जवळ, मनिषा चेतन सोनार यांनी सांगितले की, एक लहान मुलगा नाव पत्ता माहीत नाही वय अंदाजे ३ वर्ष अंगात हिरवे रंगाचा टि शर्ट त्यावर नारंगी रंगाचे जॅकेट व पांढरे रंगाचे पॅन्ट हा रस्त्यावर सापडला आहे. त्या लहान मुलास युनिट ६ गुन्हे शाखा कार्यालयात आणले आणि याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना दिली, त्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट ६ पथकाच्या वेगवेगळे पथक तयार करून वाघोली हद्दीत मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. स्थानिक परिसरातील सर्व समाज माध्यमावर मुलाच्या वर्णनासह फोटो प्रसिध्द करुन नियंत्रण कक्ष, पुणे शहर येथे अनोळखी मुलगा मिळुन आल्या बाबत माहीती देण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथकाने वाघोलीतील डोमखेल रोड, बाईफ रोड, दत्तविहार रोड या परिसरातील सोसायटया, कामगार वसाहत येथे शोध घेतला,त्यावेळी अक्षय संकृती सोसायटी, बाईफ रोड, वाघोली येथील एक महिला आपल्या मुलाचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली. त्या महिलेस मुलाचा फोटो दाखवला असता तिने तो मुलगा माझा असल्याचे सांगितले. खात्री करुन त्या मुलास आईच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले. ही सर्व शोध मोहिम अवघ्या ४ तासांत अल्पवयीन मुलाच्या घराचा शोध घेतल्याने त्यांनी पुणे शहर पोलीस दलाचे आभार मानले आहे. तसेच सतर्क नागरिक मनिषा चेतन सोनार यांचेदेखील आभार मानले आहेत.
ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट ६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, नितीन घाडगे, बाळासाहेब तनपुरे, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.
