पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) अमली पदार्थ तस्करीवर आळा घालण्यासाठी गस्तीवरील पथकाकडून भूमकर चौक अंबेगाव येथून १९,४५,०००/- रू कि.चा ओजीकुश गांजा, एम.डी. व एल.एस. डी. हे अंमली पदार्थ व इतर मुद्देमालासह तीन जणांना जेरबंद केले.

पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच अंमली पदार्थ तस्करांची माहिती काढून त्यांचेविरुध्द कारवाई करण्या संदर्भात दिलेल्या सुचना व आदेशानुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, व पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०२/१२/२०२४ रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील अधिकारी व अंमलदार गस्तीवर असताना पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना मिळालेल्या माहितीवरून कृष्णा/घोडनदीकर टॉवर बिल्डींग जवळ, श्री लॉज समोर सार्वजनिक रोड लगत, भुमकर चौक, नन्हे आंबेगाव पुणे या ठिकाणी सापळा रचुन १) अंशुल संतोष मिश्रा वय २७ वर्षे, रा. सराफ लाईन मिश्रानिवास बुलढाणा २) आर्श उदय व्यास वय २५ वर्षे, रा. १८५/५/८०, त्रिशुल शिवाजी टेक्निकल स्कुल समोर, पंत नगर, घाटकोपर इस्ट मुंबई ३) पियुश शरद इंगळे वय २२ वर्षे, रा. फ्लॅट नं ०८, आदित्य हेरिटेज, स्पाईन रोड, चिखली, चिंचवड पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर १७,४१,०००/- रू. किंमतीचा, २५१ ग्रॅम वजनाचा ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम वजनाचे एम.डी. व ६२ मि.ग्रॅम वजनाचे एल.एस.डी. असा अंमली पदार्थ व २,०४,०००/-रू. कि.चा इतर मुद्देमाल असा एकूण १९,४५,०००/- रु कि.चा मुद्देमाल अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना आढळून आल्याने त्यांचेविरुध्द सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे याठिकाणी एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (अ), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *