थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर येथील स्मशानभूमीच्या वळणावर आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक तरुण ठार एक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर फाटा लोणीकंद या अष्टविनायक प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या रस्त्यावर थेऊर स्मशानभूमी रमा माधव स्मृतिस्थळा शेजारी कोलवडीच्या बाजूनी येणारा दुचाकी स्वार आणि थेऊरकडून लोणीकंद कडे जाणारा आयशर टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

यात मृत दुचाकीस्वार दादा दत्तू शिंदे रा.काष्टी श्रीगोंदा जि. अहमदनगर तर जखमी कांतीलाल बबन पांढरे,रा.राजेगाव, ता.दौंड असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तसेच त्यांचे सहकारी पोलीस जमादार महेश कर्वे,पोलीस शिपाई राहुल कर्डिले, कदम, विशाल बनकर, पोलीस मित्र संतोष गायकवाड  घटनास्थळी धावले आणि जखमीस रुग्णालयात पाठवले यात गंभीर झालेला शिंदे उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *