थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) शिरूर हवेली मतदारसंघातील पूर्व हवेलीत असलेल्या सर्वच गावांमधून मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली मतदारांमधील उत्साह पहावयास मिळत होता सकाळी नऊ वाजेपर्यंत थंडीमुळे मतदानाचा टक्का वाढला नाही परंतू नऊनंतर मात्र मतदार मतदानासाठी रांगा लावताना दिसून आले.काही गावांमधून युवकांनी एकत्र येऊन एकोपा दाखवून दिला.

गेली पंधरा दिवस प्रचाराची राळ उठवून आपलाच उमेदवार किती सक्षम आहे पटवून देण्यात कार्यकर्ते मग्न होते.मतदारांच्या मनातील उमेदवार कोण हे आज मतपेटीत बंद झाले.आता सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहेत.

थेऊर येथील मतदारामध्ये उत्साह दिसून येत होता.मतदान केंद्रावर अपंग,वृध्दांना आणून मतदान करण्यात आले.यावरून मतदानाला खुपच महत्व प्राप्त करून दिले .

एकंदरीत शिरूर हवेली मतदारसंघात शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडल आणि सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.पंधरा दिवसाची अविश्रांत मेहनत केल्यानंतर येत्या शनिवारी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.मतदानाची टक्केवारी चांगली आल्याने निकाल आपल्याच बाजुने लागणार असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *