पुणे ( हवेलीनामा वृत्तसमुह) (पुजारी सर) विधानसभेच्या निवडणुक प्रचाराची सांगता काही तासावर येऊन पोहोचली असताना महाविकास आघाडी आणि महायुतीतील लढत अतिशय रंगतदार अवस्थेत आली आहे.रविवारचा दिवस सभांमुळे गाजला असला तरीही यावेळी प्रस्थापितांना नवख्या उमेदवाराने चांगलेच दमवल्याचे चित्र दिसून येत आहे.महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार अशोक पवार निवडणुक लढवत असून त्यांना कडवे आव्हान महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी उभे केले आहे.

यावेळी प्रथमच युवकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचे चित्र आहे शिरूर व हवेली या दोन्ही तालुक्यातील युवक मोठ्याप्रमाणात प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक सर्वार्थाने वेगळीच ठरत आहे.प्रत्येक गावातील तरुण स्वयं प्रेरणेने बाहेर पडल्याने सभा,भाषण याचा त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणताना दिसत नाहीत.

आता महत्त्वपूर्ण काम म्हणजे मतदारांना मतदानासाठी बाहेर काढून मतदान करुन घेणे आहे.महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके तरुणांच्या गळ्यातील ताईत बनल्याने निवडणूक प्रचंड रंगत आली आहे.कुठल्याच परिस्थितीत गहाळ बसायच नाही निर्धार करुन अबाल वृद्ध बाहेर पडले आहेत. विरोधक अनेक मुद्दे घेऊन प्रचार करत असले तरीही हा झंझावात आजपर्यंत कमी झालेला नाही.याचे मतात परिवर्तन झाल्यावर नवल नको.

माऊली कटके सोबत महायुतीतील सर्व घटकपक्ष जोमाने कामाला लागले आहेत त्यामुळेच प्रस्थापितांची दमछाक होत असल्याचे दिसते,हवेलीतील उरुळीकांचन, लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती,वाघोली या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह थेऊर नायगाव पेठ सोरतापवाडीसह कोलवडी,केसनंद, पूर्व हवेलीतील सर्व गावेआणि लोणीकंद येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.तर शिरूर तालुक्यातील सणसवाडी,कोरेगाव भिमा,शिक्रापूर, तळेगाव, रांजणगाव, शिरूर, न्हावरा आदी सर्व गावात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.त्यामुळेच काल अजित पवार यांनी विजय निश्चित असल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *