उरुळीकांचन (हवेलीनामा वृत्तसमुह) (पुजारी सर) आम्ही भरलेल्या टॅक्स चा वाटेल तसा उपयोग करून आम्ही विकास केला असा भास निर्माण केला.शहराभोवती तयार करण्यात येणाऱ्या रिंगरोडचा खर्च अचानक अठरा हजार कोटींवरून एक्केचाळीस हजार कोटींवर कसा जातो नेमका हा मलिदा कोणाच्या घशात जाणार आहे याचे अगोदर उत्तर द्या असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला.महाविकास आघाडीचे शिरूर हवेली मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा उरुळीकांचन येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.
खासदार कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टिकेला जोरदार प्रहार करत मी उद्या बारामतीत येऊन याचे उत्तर देईल असे ठणकावले.महायुतीने आपल्या कार्यकाळात नेमका कशाचा विकास केला सर्वसामान्य जनतेचे जीवन दुस्तर केले.जन्मलेल्या बाळाच्या व्हॅक्सिनपासून तिरडीवर पडलेल्या मुडद्याच्या कफनाच्या कापडावर देखील जी एस टी आकारुन मोठा विकास केला.एका हाताने देऊन दहा हाताने ओरबडण्याचे काम युती सरकारने केले असा घणाघात केला.
आज खरतर बराच हिसाब चुकता करायचा होता परंतु आणखी काही सभा शिल्लक आहेत, उरुळीकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केल आपला खासदार म्हणून संसदेत पाठवलेत यात आमदार अशोक पवार यांचाही मोठा वाटा आहे.त्यामुळेच पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी बापूंना मत म्हणजे पवार साहेबांना मत हे ध्यानात ठेवा असे बोलून मतदारांना आवाहन केले.
यावेळी आमदार अशोक पवार यांचेही भाषण झाले.या सभेत हवेलीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
