थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) येथील चिंतामणीच्या मंदिरात  एका मनोरुग्ण तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला. जवळपास एक दीड तासाहून अधिक काळ मंदीर परिसरात हा गोंधळ सुरू होता. दर्शनासाठी आलेल्या भाविक देखील  या प्रकारामुळे गोंधळून गेले होते मोठा कालवा करुन हा तरूण जोरजोरात आरडाओरडा करून गोंधळ घालत होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.ही घटना गुरुवारी सकाळी घडली आहे.
संदीप पोपट गायकवाड (सध्या राहणार भिल्ल वस्ती थेऊर )मूळ धामणगाव ता.आष्टी जिल्हा बीड  )तो नातेवाईकांकडे आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
संदीप हा सकाळी सात वाजता मंदिरात आला व दर्शन गाभारा मंडपामध्ये डोळे मिटून बसला जवळपास एक तासाहुन अधिक वेळ तो बसल्याचे पाहून मंदीरातील सुरक्षारक्षकांना संशय आल्याने सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून मंदिराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाने त्यांच्या नातेवाईकांना बोलवून ताब्यात दिले परंतु  तो त्यांच्या तावडीतून सुटून मंदीराच्या नगारखान्याच्या भिंतीवर चढून सभा मंडपावर उडी मारली आणि मुख्य मंदीरावर चढून आरडा ओरडा, गोंधळ घालत होता या घटनेनी मंदिर परिसरात गौंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घडलेल्या घटनेची माहिती मंदिर प्रशासनाने पोलिसांना दिली,  पोलिस घटनास्थळी येऊन त्याला खाली घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो स्वतःच्या डोक्यात कौले मारुन घेत गोंधळ घालत मोठ्या किंकाळ्या मारत होता.मंदीरच्या सभामंडपावर जाऊन बीट मार्शल यांनी त्याला विश्वासात घेऊन व्यवस्थित खाली घेतले त्यानंतर मंदीर प्रशासन भाविकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.  पोलिस हवालदार विजय जाधव, दत्तात्रय घोंगाणे,दादा कुंभार, पोलिस शिपाई किशोर कुलकर्णी, अजिंक्य जोजारे,तसेच पोलिस मित्र संतोष गायकवाड,संतोष ओव्हाळ,राहूल गायकवाड,सागर बोडरे. यांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *