पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) विधानसभा निवडणुकी प्रचाराच्या दुसर्या टप्प्यात शिरूर हवेली मतदारसंघात सर्वत्र माऊली माऊली चा नारा घुमत असून मतदारांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे.सर्वसामान्य कुंटुंबातील, धार्मिक सामाजिक जाणीव असलेला उमेदवार अशी ओळख निर्माण करण्यात ज्ञानेश्वर कटके यशस्वी झालेले आहेत.
श्रीक्षेत्र थेऊर येथून निवडणुक प्रचारास शुभारंभ केल्यानंतर कटकेंचा वारु चौफेर उधळत आहे.शिरूर तालुक्यातील सर्वच गावांमधून मिळणारा मतदारांचा प्रतिसाद, रॅलीमधील गर्दी पाहता ते वरचढ ठरत आहेत. कोरेगाव भिमा,सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे,विठ्ठलवाडी,कोंढापरी, रांजणगाव, मांडवगण फराटा,फुलगाव, तुळापूर बाभूळसर,इनामगांव,सिरसगांव आदी गावांमधून नागरिक उत्फुर्त सहभाग घेत आहेत.शिरूर तालुक्यातील महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी प्रचारास उतरले आहेत.
हवेली तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, लक्ष्मण केसकर, रोहिदास उद्रे, सुदर्शन चौधरी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव गुलाब चौधरी, उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, अजिंक्य कांचन, अलंकार कांचन, सुरज चौधरी, सुजीत चौधरी, विकास जगताप, श्रीकांत कांचन, अमित कांचन, दिलीप गाडेकर, शंकर बडेकर, जितेंद्र बडेकर, सुभाष बगाडे, यवराज कांचन. आदित्य कांचन, राहुल तांबे आदी महायुतीचे पदाधिकारी, महिला व मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिरूर आणि हवेलीतील गावागावांत , वाड्या वस्त्यांवर माऊली कटके यांना उत्स्फूर्त मोठा पाठिंबा मिळत आहे. महिलांच्या उत्साहात लक्षणीय वाढ झाली असून या आधीच्या निवडणुकांमध्ये महिलांचा असा सहभाग लक्षणीय दिसून येत आहे. “लाडकी बहीण” योजनेचा प्रभाव असो वा उज्जैन महाकाल यात्रेचा पुण्याई, महिलांनी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याचे संकेत दिले आहेत.
शिरूर हवेली मतदारसंघात सध्या ४,५९,६९३ मतदार असून त्यात २,२०,५४२ महिला, २,३८,८७४ पुरुष आणि १३ इतर मतदार आहेत. यावेळी महिलांच्या मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून महिला मतदार कटके यांच्या विजयात मोठा वाटा उचलणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नव्याने नोंद झालेल्या युवक मतदारांमध्येही उत्साह आहे, जो कटके यांना विजयास मोठी आघाडी देऊ शकतो.
