लोणी-काळभोर (हवेलीनामा वृत्तसमुह) शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघांतील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ कदम-वाकवस्ती येथील भाजपा कार्यकर्त्याची बैठक संपन्न झाली.या बैठकीस भाजपाचे अहमदाबाद,गुजरात चे खासदार हसमुखभाई पटेल यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीस भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर, सरचिटणीस भगवानराव शेळके,जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी आदी मान्यवर व भाजपा चे कदमवाकवस्ती येथील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याने महायुतीतील प्रत्येक उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून आला पाहिजे यासाठीच प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी झोकुन काम करा असे आवाहन यावेळी करण्यात आले.वातावरण अनुकूल आहे तरीही आपला भाग न भाग पिंजून काढत मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची गरज असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *