थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) शिरूर हवेली मतदारसंघात प्रचार चांगलाच रंगात आला,महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रचारातील चुरस अनुभवास येत असून हवेली तालुक्यातील गावामधून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ समर्थक सर्सावले आहेत. लोणी-काळभोर कुंजीरवाडीतून प्रचार रॅलीत मोठ्याप्रमाणात मतदार सहभागी झाले होते.थेऊर येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत समर्थक गावामधून अशोक पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत.

पूर्व हवेलीतून महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकजुटीने कामाला लागले आहेत. थेऊर मधील वाड्या – वस्त्यांमधील नागरिकांना आपल्या उमेदवाराची माहिती देऊन पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनाच निवडून द्या असे मतदारांना सांगत आहेत.गल्लोगल्ली,घराघरात जाऊन उमेदवाराविषयी माहिती दिली जात आहे.

यामध्ये माजी उपसरपंच विलास बापू कुंजीर,शहाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे,योगेश काकडे,शरद काकडे,निलेश काकडे,लक्ष्मण चव्हाण,सुरेश पडळकर, सुरेश कांबळे,प्रकाश चव्हाण, अर्जुन देवकर,तुकाराम चव्हाण, जयसिंग जाधव, संतोष ओव्हाळ, गणेश गोरसे, बशीर शेख,सुमित कुंजीर, शुभम कोळेकर, महेश चव्हाण, कुमार जाधव, अशोक चव्हाण, भरत जाधव, अनिल चव्हाण आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *