शिरूर – (हवेली नामा वृत्तसेवा ) महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.घोडगंगा कारखान्याला कर्ज का मिळाले नाही हे सर्वाना माहित आहे.देशाचे नेते शरद पवार राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अशोक पवारांच्या घोडगंगा कारखान्याला कर्ज देण्याची व्यवस्था करतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

मांडवगण फराटा(ता. शिरूर)येथे राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगनाथ शेवाळे, विकास लवांडे, संजय सातव,भारती शेवाळे, राजेंद्र नागवडे,विश्वास ढमढेरे, पोपट शेलार, वैभव यादव,संभाजी फराटे, नरेंद्र माने, सुभाष कळसकर, सुदाम साठे, कांतीलाल होळकर,संजय कळसकर,अनिल पवार, संदीप भोते, दिलीप मोकाशी आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले,घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांच्यासोबत झालेला प्रकार निंदनीय आहे.अशोक पवार हे जिल्ह्यातील एकमेक निष्ठावंत आमदार आहेत. सत्तेत सहभागी न झाल्याने त्यांच्या कारखान्याला सरकारने कर्ज दिले नाही.महाराष्ट्र राज्यातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला नेऊन येथील रोजगार पळविला जात असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्य जणू गुजरातलाच आंदण दिले आहे.शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार करून त्याची परिसीमा गाठणाऱ्या त्रिकुटाला पुन्हा सत्तेत बसवणे म्हणजे राज्याला अधोगतिकडे नेण्यासारखे आहे, हे राज्यातील जनतेने ओळखले आहे.
एकही मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात आला नाही. उलट इथले प्रकल्प गुजरातला गेले आणि महाराष्ट्र अधोगतीकडे जायला लागला. सरकारने महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला.पहिल्यांदा यांच्या काळात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १५ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आले.

आमदार पवार म्हणाले,मी सत्तेत सहभागी झालो नाही म्हणून आपल्या कारखान्याचे कर्ज अडवले गेले.पवार साहेब माझ्या हृदयातील स्थान आहे. त्यांच्यावर निष्ठा असल्याने मी त्यांच्या सोबत राहिलो आहे.१९८० साली ५२ आमदार पवार साहेबांना सोडून गेले त्यातला एकही परत निवडून आला नाही.आता ४२ आमदार गेले आहेत.राज्यातील जनता त्यांचा बरोबर कार्यक्रम राबवणार आहे.माझ्या मुलाबाबत काल घडलेला प्रकार निंदनीय व घृणास्पद आहे.लोकशाही मार्गाने निवडणुका जिंका मात्र अशाप्रकारे आमच्या कुटुंबाची कुणीही बदनामी करू नये असे बोलताना पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *