थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह)
शिरूर हवेली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचाराचा उरुळीकांचनमध्ये झंझावात दिसून आला यात तरुण पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.हवेलीतील वाघोली,उरुळीकांचन आणि लोणी-काळभोर या तीन गावातील मतदार मोठ्या संख्येत आहेत आणि लोणी-काळभोर मधील अजित पवार यांच्या प्रचारसभेतील गर्दीनंतर पूर्व हवेलीतील मोठ्या लोकसंख्येचे शहर उरुळीकांचन येथे देखील मतदारांनी तरुण तडफदार उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र दिसून आले.

आज मंगळवारी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटकेचा गावभेट दौरा पूर्व हवेलीतील गावांमध्ये होता जागोजागी उस्फूर्त स्वागत होत होते.सायंकाळी उरुळीकांचन येथे भव्य रॅली काढण्यात आली ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ दर्शन घेऊन संपूर्ण गावातून घोड्यावरून प्रचारफेरी निघाली यात महायुतीतील सर्व घटक पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
