थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) हवेली तालुक्यात गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारासाठी गावोगावी यंत्रणा सज्ज प्रत्येक गावामध्ये युवकांनी पुढाकार घेऊन घरोघरी चिन्ह पोचवण्यावर युवकांच्या कार्यकर्त्यांचा भर तर प्रत्येक गावामध्ये पक्ष संघटनेतील कार्यकर्ते तसेच महायुतीचे घटक पक्ष यांनी गावोगावी हाऊस टू हाऊस मतदारांच्या भेटीगाठी देण्यावर भर टाकला असून जाहिरनाम्याचे वाटप करुन प्रचारात रंगत आल्याचे दिसून येत आहे.

थेऊर येथे महायुतीचे घटक पक्षातील कार्यकर्ते तीस ते चाळीस पदाधिकारी एकत्रित येऊन रोज संध्याकाळी प्रचार फेरी काढत आहेत व थेऊर मधील प्रत्येक वॉर्डमधील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन माऊली आबालाच का निवडून द्यायचं हे मतदारांना पटवून देत आहेत यात गावातील आजी-माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायतचे सदस्य यांनी पुढाकार घेतला असून अनेक तरुण कार्यकर्ते हे प्रचार फेरीत सहभागी होत आहेत आबाल वृद्ध जेष्ठ नागरिक तरुणांची संख्या रॅलीला मोठ्या प्रमाणावर मतदारांचा प्रतिसाद मिळत गावोगावी प्रचार फेरी काढून प्रत्येक गावातील युवकांनी माऊली आबांची प्रचार यंत्रणा आपल्या हातात घेतली असून यामध्ये तरुणांचा पुढाकार आहे त्यामुळे माऊली आबांचा विजय निश्चित असल्याचे हे पदाधिकारी सांगत आहेत.
