लोणी काळभोर:- ( हवेलीनामा वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांचे लोणी काळभोर तसेच पूर्व हवेलीत जल्लोषात स्वागत लोणीत घोड्यावर बसून मिरवणूक काढली तर काही ठिकाणी बैलगाडीत मिरवणूक काढण्यात आली यावेळी कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक व युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती महिला भगिनींनी ही मोठी गर्दी केलेली होती. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी अशोक पवार यांना खांद्यावर घेऊन गावाच्या गावातून मिरवणूक काढली. खोकलाई चौकातून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. जेसीबी मधून फुलांची उधळण करून, घोड्यावरती बसून अशोक पवार यांची संपूर्ण गावांमध्ये रॅली काढण्यात आली. नागरिकांचा प्रतिसाद पाहिला मिळाला. महिला वर्गांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रामदैवत अंबरनाथच्या मंदिरापुढे कोपरा सभा घेतली .
यावेळी बोलताना अशोक पवार म्हणाले की, माझ्यासमोर विरोधामध्ये मलिदा गॅंग आहे, ते काही विकास काम केलेले लोक नाहीत. चुकीच्या मार्गाने पैसे कमवून कुठेतरी लोकांना तीर्थयात्रा घडवायच्या.माझ्या मुलाचे अपहरण करून मोठे घृणास्पद काम केले आहे. अक्षरशः मुलाला गाडी वरती बसवून एका ठिकाणी नेऊन त्याचे कपडे काढून, गळ्याला चाकू लावून, त्याला निर्वस्त्र केले एका महिला भगिनीलाही त्या ठिकाणी बोलावून तिचे तुकडे काढून त्याच्याबरोबर फोटो काढून दहा कोटीची खंडणी मागितली. एवढे घाणेरडे राजकारण करू नये . तिकडे मांडवगण मध्ये हा प्रकार घडला आहे तरी मी इथे तुमच्यासमोर उभा आहे. माझी पत्नी इथे खंबीरपणे उभी आहे. हे बोलत असताना अशोक पवार भा वू क झाले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास आण्णा काळभोर,माजी सदस्य माधव आण्णा काळभोर, भारती शेवाळे,सुनंदा शेलार, शांताराम कटके, विकास लवांडे, भारती शेवाळे, सनी उर्फ युगंधर काळभोर,माजी सरपंच शितल काळभोर, नागेश काळभोर,भारती शेवाळे, संदीप गोते, राजेंद्र पायगुडे, संजय भालेराव आजी माजी सरपंच सदस्य उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
