लोणी-काळभोर (हवेलीनामा वृत्तसमुह) यशवंत सहकारी साखर कारखान्यासह शिरूर तालुक्यातील घोडगंगा कारखाना देखील चालू करणार त्यासाठी आपल्या विचाराचे सरकार राज्यात सत्तेवर पुणे आवश्यक आहे.राज्यातील आर्थिक निर्णय घेण्यासाठी पैशाची गरज असते यासाठी केंद्रात देखील आपल्या विचाराचे सरकार असले पाहिजे.आता केंद्रीय सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत त्यांच्याकडून आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणता येईल. यशवंत चालू करण्यासाठी केंद्रीय नेत्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.आपली राज्यात सत्ता स्थापन झाल्यावर यशवंतचा प्रश्न मार्गी लावणारच हा अजित पवारांचा वादा आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला.

अजित पवार लोणी-काळभोर येथून शिरूर हवेली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलत होते.यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुरेश घुले, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर, रोहिदास उंद्रे आबा काळे,दिलीप वाल्हेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप काळभोर, लोणी-काळभोरच्या सरपंच सविता लांडगे,महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.

अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांचा समाचार घेतला,ते म्हणाले हा आमदार माझी बदनामी करत सुटलाय,खोटा प्रचार करतोय की,घोडगंगा साखर कारखाना मी बंद पाडला.पण याला तो निट चालवता आला नाही बंद साखर कारखान्यावर आपल्याच चिरंजीवास अध्यक्ष बनविले,याठिकाणी एखाद्या अनुभवी व्यक्तीची निवड करणे गरजेचे असते हे एवढ कळेना.कुठेह भाऊबंदकी आडवी येते अस म्हणत उपस्थितांमध्ये एकच हश्शा निर्माण झाला.
ते पुढे म्हणाले की,आपल्या महायुतीतील सर्व उमेदवार कसे विषमतेचे निवडून येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून द्या,म्हणजे सध्या चालू असलेल्या योजना आपल्याला पुढे चालू ठेवता येतील. आपली बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खुपच प्रभावी ठरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.विशेष म्हणजे आपल्याच योजनांचा महाविकास आघाडीने त्यांच्या पंचसुत्रीत काॅपी केली असल्याचे सांगितले.
तसेच पुणे शहराचा विस्तार होत असून पुणे सोलापूर महामार्ग तसेच पुणे नगर महामार्गावरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून चार मजली उडाणपुल तयार करण्यात येईल तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रोचा विस्तार उरुळीकांचन, सासवड, वाघोली तसेच चांदणी चौकापर्यंत करण्यात येईल असे पवार म्हणाले.आम्ही व्हिजन देणारे आहोत, केवळ आश्वासनाची बरसात करणारे नाही.
यावेळी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,मतदार संघातील सर्व मतदार मला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद देत असून मला विजयाची खात्री आहे.महांकाल दर्शनानंतर मी आयोध्या आणि काशी यात्रा घडवून आणणारच त्यामुळे मला माझ्या मतदारांचा आशिर्वाद निश्चित मिळणार याची खात्री आहे असे सांगितले.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद आणि दिलीप वाल्हेकर यांचीही भाषणे झाली.आभार प्रदर्शन लोणी-काळभोरचे माजी सरपंच योगेश काळभोर यांनी मानले.
