tempo driver kicked a person to death
              राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन) येथील खेड घाटातील इंदिरा पाझर तलावाच्या पाण्यात २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून तरुणाचे नाव अझर वजीर शेख (रा. पिंपळे गुरव, पुणे ) असे आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
           याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरूनगर जवळील सांडभोरवाडीच्या हद्दीत इंदिरा पाझर तलावाच्या पाण्यात एका युवकाचा मृतदेह  तरगंत असल्याचे सांडभोरवाडी ग्रामपंचायतचे शिपाई  दयाराम विठ्ठल आरुडे यांनी पोलीसांना सांगितले. आरुडे हे  पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला.
      पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. माशांनी चेहरा खाल्यामुळे चेहरा निटसा ओळूख येत नव्हता. त्यामुळे मृतदेहाच्या खिशातील डायरीतील नातेवाईकांचा नंबर घेऊन त्यांना संपर्क केल्यामुळे संबंधीत आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटली आहे. मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास खेड पोलिस करित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *